Threat from Chinese Mobile Phones : भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील (India China Dispute) तणाव कायम आहे. चीनच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण गुप्तचर यंत्रणांनी चिनी मोबाईल फोनबाबत (Chinese Mobile) धोक्याचा इशारा दिला आहे. चीन मोबाईलद्वारे सैनिकांची हेरगिरी करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सर्तकतेचा इशारा दिला आहे. 


चिनी मोबाईल फोनबाबत सतर्कतेचा इशारा


गुप्तचर यंत्रणांनी सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबियांना चिनी मोबाईल फोनबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुप्तचर यंत्रणांनी सीमेवर तैनात असलेले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय चिनी मोबाईल फोन न वापरण्याचा इशारा दिला आहे आणि सतर्क राहण्यास सांगितलं आहे. संरक्षण गुप्तचर संस्थांनी इशारा देत सांगितलं आहे की, सैनिकांनी चिनी मोबाईल फोन उपकरणांपासून सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे.


चिनी मोबाईल फोनमध्ये सापडलं मालवेअर


एएनआयच्या रिपोर्टनुसार, गुप्तचर यंत्रणांनी भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना चिनी फोन विकत घेणं आणि वापरणं टाळण्याचा इशारा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये सुरक्षा यंत्रणांना चिनी मोबाईल फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडले आहेत.






चिनी ॲप्सवरही कारवाई


देशातील व्यावसायिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या चायनीज मोबाईल फोनमध्ये Vivo, Oppo, Xiaomi, One Plus, Honor, Realme, ZTE, Gionee, Asus आणि Infinix यांचा समावेश आहे. या आधीही, गुप्तचर संस्थांनी चिनी मोबाईल फोन ॲप्सच्या विरोधात कारवाई केली आहे. लष्करी जवानांच्या फोनवरून चिनी ॲप्स हटवण्यात आले आहेत.


भारत-चीन संघर्ष सुरूच


भारतीय संरक्षण दलाने चायनीज मोबाईल फोन आणि चायनीज ॲप्लिकेशन्स वापरणंही बंद केलं आहे. मार्च 2020 पासून भारत आणि चीनमधील लष्करी संघर्ष वाढला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) एकमेकांविरुद्ध सैन्य तैनात केलं आहे. नुकतेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


India-China Dispute : चीनला थोपवण्यासाठी भारताची तयारी, रस्त्यांचं काम युद्धपातळीवर; LAC वर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर