Ias Officer Message Viral: एका व्यक्तीने आयएएस (IAS) अधिकाऱ्याला केलेला एक मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्यक्तीचा हा मेसेज आयएएस अधिकाऱ्यांनी ट्विटरवर देखील शेअर केला आहे. हा मेसेज ट्विटरवर शेअर केल्यानंतर अनेक नेटकरी हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीला सल्ला देत आहेत आणि ट्रोल ही करत आहेत.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. अवनीश शरण हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा कॅडर छत्तीसगड आहे. अवनीश याना ट्विटरवर जवळपास 4 लाख लोक फॉलो करतात. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये या व्यक्तीने लिहिले आहे की, ''शुभ संध्याकाळ सर. माझी मुलगी पाचवीत आहे. मला तिला आयएएस अधिकारी बनवायचे आहे. यासाठी अभ्यासाचे वातावरण कसे तयार करायचे, यासाठी मला मार्गदर्शन करा. तिला पुस्तके आवडतात. कृपया पुस्तकांसह मार्गदर्शन करा, जेणेकरून तिचे ज्ञान वाढेल. तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.''
या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत IAS अधिकाऱ्याने लिहिले आहे की, ''या मेसेजला मी काय उत्तर द्यावे?'' या ट्विटनंतर अनेक लोकांनी यावर आपली वेगवेगळी मते द्यायला सुरुवात केली. काही लोक या व्यक्तीला आपला मुलीला तिच्या आवडीप्रमाणे जगू द्या असे म्हणाले, तर काही लोक त्याला ट्रोल करत आहेत.
ही पोस्ट शेअर करताना महाराष्ट्र पोलिसांचे विशेष आयजी कृष्ण प्रकाश यांनी लिहिले की, तुमच्या मुलांना त्यांचे बालपण जगू द्या. अनेकदा आपण आपल्या स्वप्नांचे ओझे आपल्या मुलांवर टाकतो. त्यांना त्यांचे बालपण जगू द्या, त्यांना मोकळ्या आकाशात उडू द्या... आतापासून त्यांचे भविष्य ठरवू नका...
संबंधित बातम्या :