नवी दिल्ली : भारत (India) अलिकडच्या काळात लष्करी सामर्थ्य (Indian Military Power) वाढवण्यावर भर देत आहे. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून  सैन्य दलासाठी (Indian Army) आधुनिक उपकरणे खरेदीसाठी 9 भांडवल अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. सशस्त्र दलासाठी 45000 कोटींची उपकरणे खरेदी करण्यासाठीच्या प्रस्तावाला  DAC कडून मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर, रोजी संरक्षण संपादन परिषदेची (DAC) महत्त्वाची बैठक पार पडली. 


सशस्त्र दलासाठी 45000 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी


या बैठकीत DAC ने सुमारे 45,000 कोटी रुपयांच्या 9 भांडवली संपादन प्रस्तावांना आवश्यक मंजुरी (AoN) देण्यात आली आहे. आत्मनिर्भर आणि मेड इन इंडिया संकल्पनेला चालना देण्यासाठी या सर्व उपकरणांची खरेदी भारतीय कंपन्यांकडून केली जाणार आहे.  सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून, भारतीय-देशांतर्गत डिझाइन केलेले, विकसित आणि उत्पादित (IDMM)श्रेणी अंतर्गत केली जाणार असून, यामुळे ‘आत्मनिर्भर भारताचे’ उद्दिष्ट साध्य  करण्याच्या दिशेने भारतीय संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळेल. 






स्वदेशीवर भर देण्याचा प्रयत्न


PIB च्या अहवालानुसार, संरक्षण संपादन परिषदेने (DAC) संरक्षण सज्जता, गतिशीलता, हल्ला करण्याची क्षमता आणि यांत्रिक दलाची टिकून राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी चिलखती बहुउद्देशीय वाहने (LAMV) आणि एकात्मिक तेहळणी यंत्रणा आणि लक्ष्यीकरण प्रणाली (ISAT-S) च्या खरेदीसाठी मान्यता दिली आहे. लष्कराला वेगाने हालचाल करता यावी यासाठी, तसेच तोफखाना आणि रडारच्या तैनातीसाठी DAC ने उच्च गतिशीलता वाहने (HMV) आणि गन टोइंग वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशीकरणाच्या दिशेनं पावलं उचलण्यावर भर दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, IDDM प्रकल्पांसाठी 50 टक्के स्वदेशी सामग्रीच्या मर्यादेऐवजी, किमान 60-65 टक्के स्वदेशी सामग्रीवर लक्ष्य केंद्रीत केलं जावं.


नेक्स्ट जनरेशन सर्व्हे शिपच्या खरेदीलाही मान्यता


संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, DAC ने तोफखाना आणि रडारच्या जलद तैनातीसाठी हाय मोबिलिटी व्हेईकल (HMV) तसेच गन टोइंग वाहनांच्या खरेदीसाठी AON ला मान्यता दिली आहे. DAC ने नौदलासाठी पुढील पिढीच्या सर्वेक्षण जहाजांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे, यामुळे हायड्रोग्राफिक ऑपरेशन्सची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.


हवाई दलासाठी काय?


ऑपरेशनल अचूकता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी डॉर्नियर विमानात एव्हीओनिक अपग्रेडेशनचा समावेश असलेल्या भारतीय हवाई दलाच्या प्रस्तावांसाठी AON खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच, स्वदेशी बनावटीच्या ALH MK-IV हेलिकॉप्टरसाठी शक्तिशाली स्वदेशी शस्त्र म्हणून ध्रुवस्त्र शॉर्ट रेंज एअर-टू-सर्फेस क्षेपणास्त्राच्या खरेदीला DAC कडून मान्यता देण्यात आली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून संबंधित उपकरणांसह 12 Su-30 MKI विमानांच्या खरेदीसाठी AON देखील मंजूर करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Anantnag Encounter : 'मला गोळी लागलीय, मी वाचण्याची शक्यता कमी...'; हुतात्मा DSP हुमायू भट्ट यांनी पत्नीला केलेला 'तो' व्हिडीओ कॉल अखेरचा ठरला