Cyclone Sitrang : सध्या सितरंग चक्रीवादळाचा (Sitrang Cyclone) धोका पाहायला मिळत आहे. बांगलादेशमध्ये कहर माजवल्यानंतर सितरंग चक्रीवादळ जमिनीवर धडकलं आहे. पण याचा परिणाम कायम राहणार आहे. भारतात काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारताशेजारील बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा झटका बसला आहे. आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं सितरंग चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारट्टीवर धडकलं. सितरंग चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये आतापर्यंत सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात अलर्ट देण्यात आला आहे. भारतातही काही भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचा फटका
भारतातही चक्रीवादळाचा वाढता धोका पाहता अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सितरंग चक्रीवादळाचा 20 हजाराहून अधिक बांगलादेशी नागरिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळानुळे घरे आणि झाड् मोडली आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आता भारतातही सितरंग चक्रीवादळाचं रौद्र रूप धारण करण्यार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ईशान्येकडील चार राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाममधील 80 हून अधिक गावांना वादळ आणि पावसाचा फटका बसला आहे. वामान खात्याकडून नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून बचाव पथकांच्या तुकड्याही पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भारतात अनेक भागांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये प्रशासन तयारीत असून अनेक भागांमध्ये बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.
बांगलादेशमध्ये 35 जणांचा मृत्यू
चक्रीवादळामुळे बांगलादेशमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. बांगलादेशमधील दक्षिण आणि पश्चिम भागात सर्वात वाईट स्थिती आहे. आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर सहा हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं आहे. हजारो मासेमारी प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तयार झालेले सितरंग चक्रीवादळ ईशान्य दिशेने बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकलं. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बांगलादेशला फटका बसला.
चक्रीवादळाचा भारताला धोका कायम
सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. पण भारताच्या किनारपट्टीकडील भागात याचा परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सितरंग वादळ सीतारंग किनाऱ्यावर धडकताना त्याची तीव्रता कमी होईल.अनेक राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या वादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झालं आहे, तर शेकडो नागरिकांना याचा फटका बसला आहे. याशिवाय बिहारमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.