Cyclone Jovad : ओमायक्रॉनसोबतच (Omicron) आणखी एक संकट देशावर चाल करुन येत आहे. 'जोवाड' (Cyclone Jovad) चक्रीवादळाची बंगालच्या उपसागरात निर्मिती झाली आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि उडीशाच्या किनारपट्टी भागात धडकून पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार आहे. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात पोहोचताना वादळाभोवती फिरणाऱ्या चक्रीवादळाचा वेग ताशी 100 किलोमिटरपर्यंत असणार आहे.
किनारपट्टीजवळ येताना 'जोवाड' चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याचा शक्यता आहे. वादळ जमिनीवर धडकल्यानंतर तीव्रता कमी होणार आहे. किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधानांकडून जोवाड चक्रीवादळासंदर्भात काल आढावा बैठक घेण्यात आली आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान आंध्र प्रदेश, उडीशा आणि पश्चिम बंगालला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे. पाच डिसेंबरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व ऑपरेशन्स रद्द करण्यात आली आहेत.
सर्वाधिक फटका आंध्रतील श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, उडीशातील गजापती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंहपूर, केंद्रपारा जिल्ह्यांना बसण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, उडीशा, पश्चिम बंगालसोबतच आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात देखील पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्राला जोवाड चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही
एनडीआरएफकडून बोटी, वृक्षतोड करणारे, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी परिपूर्ण असलेले 29 चमू सज्ज ठेवले आहेत तर 33 चमूंना गरजेनुसार तयार आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. लष्कराचे हवाई दल आणि अभियंता कृती दल विभाग गरज पडल्यास तैनातीसाठी सज्ज आहे. पूर्व किनारपट्टीवर आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके गरजेनुसार सज्ज करण्यात आली आहे.
'जोवाड' नाव कसं ठेवलं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha