Paints Stocks : कच्च्या तेलाच्या किमती ( Crude Oil Price Hike) वाढल्याचा फटका संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) सहन करावा लागू शकतो. मात्र शेअर बाजारात (Indian Stock Market) कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेंट्स कंपन्यांच्या (Paints Companies) शेअर्सना सर्वाधिक फटका बसत आहे. कारण महागड्या कच्च्या तेलाच्या दरवाढीचा मोठा फटका कलर बनवणाऱ्या कंपन्यांना सोसावा लागणार आहे. महाग कच्च्या तेलामुळे त्यांची किंमत वाढेल, ज्यामुळे पेंट्स कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल. आम्ही तुम्हाला सांगूया की कच्च्या तेल हा पेंट्स बनवणार्या कंपन्यांसाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे.
पेंट्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
सोमवारी, इंडिगो पेट्सचा (Indigo Paints) स्टॉक 11 टक्क्यांनी घसरून 1,498 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला. इंडिगो पेट्सचा स्टॉक सध्या 1536 रुपयांवर आहे. पेंट्स क्षेत्रातील मोठी कंपनी एशियन पेंट्सच्या (Asian Paints) स्टॉकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. एशियन पेंट्सचा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरून 2601 रुपयांवर आला, तर सध्या 2.92 टक्क्यांच्या घसरणीसह तो 2658 रुपयांवर व्यवहार करत आहे.
एशियन पेंट्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3590 रुपये आहे. नेरोलॅक पेंट्स (Kansai Nerolac Paints) चा शेअर देखील 5 टक्क्यांनी घसरला आणि तो 423 रुपयांवर गेला. बर्जन पेंट्स (Berger Paints) चा शेअर 2.79 टक्क्यांनी घसरून 634 रुपयांवर व्यवहार करत आहे. शालिमार पेंट्स (Shalimar Paints), अकझो नोबेल इंडियाच्या (Akso Nobel India) शेअर्समध्येही घसरण झाली आहे.
पेंट्सच्या किमती वाढण्याची शक्यता
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर, पेंट निर्मात्या कंपन्याना त्यांच्या पेंट्सच्या किंमती वाढवाव्या लागण्याची शक्यता आहे. पेंट्स किंमत वाढल्यास साहजिकच त्याचा परिणाम मागणीवर दिसून येतो. त्यामुळे घर रंगवणे सामान्यांसाठी महाग होऊ शकते. यामुळेच स्टॉक एक्स्चेंजमध्ये पेंट्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.
टीप : येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या. एबीपी न्यूज पैसे गुंतवण्याबाबत कोणताही सल्ला देत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
- Viral Video : जिराफला खायला घालणे पडले महाग, आईवडीलांनी वाचवला मुलाचा जीव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha