मुंबई : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. सीरम इन्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोवोव्हॅक्स ही लस निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. 


कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर वापराची मंजुरी मिळणारी कोव्होव्हॅक्स ही भारतातील तिसरी लस आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाल्यामुळं आता 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.


 




देशातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, पुणे यांनी कोवोव्हॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन आधीच सुरु केले आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्वीट करून ही माहिती दिली होती आणि एक नवीन यश प्राप्त केल्याचे सांगितलं होतं. नोव्हावॅक्सने तयार केलेल्या कोविड-19 लसीची पहिली खेप तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्याला कोवाव्हॅक्स नाव देण्यात आले आहे अशी माहिती इन्स्टिट्यूटने दिली होती. 


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पात्र लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. तर येत्या काळात आता मुलांना लस देण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या :