Corona Vaccination : देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी सोमवार 1 मार्चपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु होणार आहे. सरकारने लसीकरणासाठी 10 हजार शासकीय आरोग्य केंद्रे निश्चित केली आहेत. तेथे ही लस विनामूल्य दिली जाईल. या व्यतिरिक्त खरेदी करुनही लस घेतली जाऊ शकते.


नोंदणी न केल्यास लस मिळणार का?


लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना 'वॉक इन रजिस्ट्रेशन' ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असं बोललं जात आहे.


Corona | आता कोरोनाची लस गोळ्या आणि स्प्रेच्या स्वरुपात मिळणार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग


लसीसाठी आपली नोंदणी कशी करावी


सरकारी अधिसूचनेनुसार, ही लस घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम को-विन अ‍ॅपवर नोंदणी केली पाहिजे. एकदा नोंदणी झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. यामध्ये लस घेण्याची तारीख, ठिकाण आणि वेळ याविषयी माहिती देण्यात येणार आहे.


नोंदणीसाठी कोणती ओळखपत्रे वैध असतील?


आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, जॉब कार्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, खासदार, आमदार व एमएलसी यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र नोंदणीस वैध असतील.


corona | कोरोनाकाळात भारतातील तब्बल 37.5 कोटी बाच्या आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान; सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल


सरकारने माहिती दिली की, 20 हजार लोक खासगी केंद्रांवरही कोरोना लस घेऊ शकतात. लसीसाठीच्या राष्ट्रीय तज्ज्ञांनाच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 50 वर्षांपेक्षा जास्त किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या 50 वर्षांवरील लोकांची संख्या सुमारे 27 कोटी आहे. एक यादी तयार केली जात आहे ज्यामध्ये आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोणत्या आजारांचा समावेश असेल. या आजारांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.


Corona | राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजाराहून जास्त रुग्ण, वाशिममध्ये एकाच शाळेतील 229 विद्यार्थी बाधित


हिल्या टप्प्यात 1.34 कोटी नागरिकांचं लसीकरण


लस मोहिमेचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला होता. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 1.34 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 2000 खासगी केंद्रांचा सहभाग होता परंतु दुसर्‍या टप्प्यात खासगी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील 12 हजार खासगी रुग्णालये आयुष्मान भारतशी जोडली आहेत.


Amaravati | अमरावतीत विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट? केला जात असल्याचा दावा