COVID-19 vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोशिएशनने केले आहे. नव्या व्हेरिअंटच्या शिरकावाने चीनची आरोग्ययंत्रणा पुरती कोलमडलीये. चीनमध्ये सुपरफास्ट स्पीडने वाढणारी कोव्हीड रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झालं आहे. खबरदारी म्हणून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना केंद्राकडून करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर  इंडियन मेडिकल असोशिएशनने बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केले आहे. 


आता कुठे कोरोना नावाचं संकट मागे सारुन सगळं सुरळीत सुरु झालं होतं, आता कुठे मास्कविना चेहरे दिसू लागले होते.. मात्र आता पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्कनं घातलेले चेहरे दिसणार आहेत. कारण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलंय. तसंच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावं अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत.. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नीती आयोगाचे सदस्यही उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. 






कोरोनाचा धोका लक्षात घेता, केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली. तसेच नागरिकांना कोविड परिस्थितीत 'एप्रोप्रिएट बिहेविअर' (Appropriate Behaviour) म्हणजेच योग्य वागणूकीचा सल्ला दिलाय. यामध्ये मास्क घालण्यापासून सोशल डिस्टन्सिंग, बूस्टर डोस, लसीकरण यासह आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला.


पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरिय बैठक घेतली आहे. या बैठकीला अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह डॉक्टर आणि तज्ज्ञांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये मास्कसक्तीच्या निर्णायावर चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना चाचण्या वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचं समजतेय. 


आणखी वाचा :
Corona : 'केवळ मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच नाही, तर 'या' गोष्टींचीही काळजी घ्या' सरकारडून जारी 'एप्रोप्रिएट बिहेविअर' काय आहे?