सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड 19 प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.


सीरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे दर युरोप-इंग्लंडपेक्षा अधिक का? कोविड संकटात नफा कमावणे योग्य आहे का?



सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जी देशात सर्वाधिक वापरली जाणारी Covishield ही कोविडची लस बनवते यांनी सुरुवातीच्या दराच्या दीड पट दराने लसीची किंमत वाढवलीय. कोविशिल्ड लसीचा केवळ काही प्रमाणात साठा हा 600 रुपयांनी विकला जाणार आहे. सीरमने आज किंमतीबाबत दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, या लसीची किंमत अद्याप इतर वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या लसींपेक्षा कमीच आहे. कोविडच्या उपचारांसाठी लागणारी महत्वाची उपकरणं आणि इतर जीवघेण्या रोगांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींपेक्षा कोविशिल्डची किंमत कमी आहे, अशी बाजू सीरमने मांडली.


सीरमने दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी पुढे म्हटलंय, "सध्याची कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोना व्हायरस हा सतत म्युटेट होताना दिसतोय, त्यामुळे रुग्णांची वाढती संख्याही भीषण आहे. या रोगाची अनिश्चितता ओळखून तुमची सक्षमता वाढवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यासाठी गुंतवणुकीचीही तितकीच गरज आहे, जेणेकरून सीरम इन्स्टिट्युट लसींचं उत्पादन आणखी मोठ्या संख्येने करण्यास सक्षम होईल."


पुण्यात तयार होत असूनही सीरमची लस महाराष्ट्राला 24 मेपर्यंत मिळणार नाही, परदेशी लसींबाबत चाचपणी सुरू



कोविशिल्डच्या किंमतीवर अनेकांनी बोट उगारलं असताना सीरमने त्यावर म्हटलंय की, सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीच्या किंमतीची तुलना जागतिक लसींच्या किंमतीशी केली जातेय. कोविशिल्ड ही लस सध्या बाजारात उपलब्ध असलेली सर्वांना परवडणारी अशी लस आहे. सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, कारण काही देशांनी तातडीच्या उत्पादनासाठी आगाऊ निधी दिला होता, त्यानुसार ही किंमत ठेवली गेली. भारतातील लसीकरण मोहिमेसाठी सुरुवातीला जो पुरवठा केला गेला तेव्हादेखील या लसीची किंमत कमी असल्याचं स्पष्टीकरण सीरम इन्स्टिट्युटने दिलं.


New COVID Vaccine : Serum आणि Novavax कंपन्यांनी तयार केली नवी लस, नव्या लसीच्या चाचण्या सुरू



 


संबंधित बातम्या


Covovax | सीरम इन्स्टिट्यूट आणि  Novavax यांच्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात


Corona Vaccination | महाराष्ट्रातील व्यापक लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदर पुनावाला यांच्यात चर्चा