Coronavirus Cases in India Today : देशातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसत आहे. देशात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात 2382 नवे कोरोनाबाधित
महाराष्ट्रात शनिवारी 2 हजार 382 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 11 रूग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात दोन हजार 371 रूग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात दोन हजार 853 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 78,53,661 रूग्ण करोनातून मुक्त झाले आहेत.
कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709
देशात गेल्या 24 तासांत 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 25 हजार 709 वर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात 17 हजार 790 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 30 लाख 81 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 449 इतकी आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.33 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.47 टक्के आहे.
कोरोनाच्या 199 कोटी लसींचा टप्प पूर्ण
शनिवारी दिवसभरात देशात 25 लाख 59 हजार 840 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरणात 199 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या