मुंबई : भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन लसीसंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कंपनीने काही विशिष्ट आजारांवर उपचार घेणाऱ्यांनी ही लस घेऊ नये, असं स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला, किमोथेरपीसारखे उपचार सुरु असणारे रुग्ण, रक्त पातळ करण्यासाठी औषध घेणारे रुग्ण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्समुळे मात्र संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.


कोरोनावरील प्रभावी लस येणार असं ज्यावेळी सांगण्यात येत होतं. त्यावेळी ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच, फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यापाठोपाठ आजारी रुग्णांना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता भारत बायोटेकच्या वतीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून त्यामधून काही आजार असणाऱ्या, तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असं स्पष्ट केलं आहे.


पाहा व्हिडीओ : 'कोवॅक्सीन'संदर्भात भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी



भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनी कोवॅक्सीन घेऊ नये असं म्हटलं आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी देखील कोवॅक्सीन घेऊ नये. याव्यतिरिक्त गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच, नवजात बालकांच्या मातांनीही लस घेऊ नये असं सांगण्यात आलं आहे.


दरम्यान, स्वदेशी लस भारत बायोटकला आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेकांनी लसीच्या सुरक्षितेविषय प्रश्न उपस्थित केले होते. कोवॅक्सिनची सुरक्षा, तिचा दर्जा, त्यामुळे होणारे परिणाम यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याचदरम्यान, भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन 200 टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या :