India Corona Test Guidelines : संपूर्ण जगाची धाकधुक वाढवणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Covid-19) नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) देशातही आपले हातपाय पसरले आहेत. देशात एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी कोरोना चाचणीबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. 


कोरोना रुग्णांचा संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत (Corona Test) आता आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  (ICMR) नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.  एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.



आयसीएमआरनं जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्स काय? 


देशात कोरोनाची रोज नवीन आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्वरित चाचण्या करून घेण्याच्या सूचना आजवर देण्यात येत होता. मात्र आता आयसीएमआरनं अशा सरसकट चाचण्यांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आयसीएमआरनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्याची गरज नाही, असं ICMR नं म्हटलं आहे. त्याचबरोबर सहव्याधी असलेली व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात असेल तर केवळ त्यांची चाचणी गरजेची असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. व्याधीने ग्रासलेल्या व्यक्तींना लवकर विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचनाही आयसीएमआरनं दिल्या आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारी वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे, मात्र कुणीही बेफिकीर न राहण्याचं आयसीएमआरनं सांगितलं आहे. 





होय, तिसरी लाट आलीय : आरोग्यमंत्री राजेश टोपे 


राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. सध्या वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही अजून वाढेल आणि ती जानेवारी अखेरीस उच्चांग गाठेल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून 85 टक्के रुग्ण हे कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येणार असून टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह