COVID-19 India: कोरोना व्हायरसनं (Coronavirus) पुन्हा एकदा संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोना (Covid-19) उद्रेकाचं केंद्रबिंदू असणाऱ्या चीनमध्ये (China Corona Updates) पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भाव (India Corona Updates) वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये एका दिवसांत लाखो रुग्णांची नोंद केली जात आहे. चीनमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग अलर्ट मोडवर आहे. चीनमधील कोरोना प्रादुर्भावानंतर भारत सरकारही (Indian Government) सतर्क झालं आहे. चीनच्या तुलनेत भारतात (India) अद्याप कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. याबाबत तज्ज्ञ अनेक कारणं सांगतात. यासोबतच भारताची स्थिती चीनसारखी होणार नाही, असा दावाही तज्ज्ञांकडून सातत्यानं केला जात आहे.
देशातील वॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी मंगळवारी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, ज्या लोकांना आधीच बूस्टर डोस मिळाला आहे, ते CoWIN वर नेजल वॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत. यासोबतच ज्यांनी आधीच एक बूस्टर डोस घेतला आहे, अशा व्यक्तींना दुसरा बूस्टर डोस न घेण्याचा इशारा दिला आहे.
चीनमधील प्रादुर्भावाबाबत अद्याप ठोस माहिती नाही : डॉ. अरोरा
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान डॉ. एन. के. अरोरा यांनी बोलताना सांगितलं की, चीनमध्ये लसीकरणाची स्थिती, नव्या कोरोना रुग्णांची स्थिती आणि तिथे संसर्ग होणारे व्हेरियंट्स याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. आकडे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) चीनकडे कोरोनाबाबत योग्य डेटा शेअर करण्याचे आवाहन केलं होतं. डब्ल्यूएचओनं सांगितलं होतं की, आम्हाला स्पष्ट माहिती देण्यात यावी जेणेकरून कोरोनाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करता येतील. पण अद्याप चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
आपल्या सतर्क राहण्याची गरज : डॉ. अरोरा
डॉ. अरोरा म्हणाले की, "चीनमधील सध्याची जी परिस्थितीत समोर येत आहे. त्या परिस्थितीत आपल्याला हाय अलर्टवर राहण्याची गरज आहे. अशी परिस्थिती भारतात होऊ नये, जिथे आपल्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. त्यासाठी आपल्याला आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, अशी अनेक कारणं आहेत. ज्यांमुळे भारत चीनच्या तुलनेत साथीच्या रोगाशी लढण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.
यादरम्यान त्यांनी सांगितलं की, यातील मुख्य कारण म्हणजे 'हायब्रिड इम्युनिटी'. जे वॅक्सिन आणि नैसर्गिक प्रतिकारशक्तीचं मिश्रण आहे. भारतीय लोकांमध्ये लसीच्या प्रतिकारशक्तीसोबत नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती, त्यामुळे भारताची स्थिती चांगली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतात 12 वर्षांखालील 96 टक्के मुलांना कोविडची लागण झाली आहे. ज्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. डॉ. अरोरा यांनी असंही सांगितलं की, पुणेस्थित जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सद्वारे एमआरएनए लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ही लस म्यूटेशनच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे एक शक्तिशाली शस्त्र ठरू शकते.