Nasal Covid Vaccine: भारत बायोटेकने विकसित केलेल्या BBV-154 इंट्रानॅसल लशीला DGCI ने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी माहिती दिली. नाकावाटे दिली जाणारी (Nasal vaccine) ही भारताची पहिली लस आहे. ही लस 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी देण्यात येणार आहे. आपात्कालीन स्थितीत लस वापरला मंजुरी देण्यात आली आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला मोठे बळ मिळाले असल्याचे ट्वीट त्यांनी केले.  भारत बायोटेकच्या ChAd36-SARS-CoV-S COVID-19 नेझल वॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देत असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.


नेझल वॅक्सिनला देण्यात आलेली मंजुरी ही कोरोना महासाथीच्या विरोधातील आपल्या सामुहिक लढाईला आणखी मजबूत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


 






 


Intra Nasal Vaccine च्या बुस्टर डोससाठी 9 ठिकाणी चाचणी करण्यात आली होती. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे. 


नेझल वॅक्सिन काय आहे?


नेझल वॅक्सिन नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. ही लस स्प्रेद्वारे अथवा एरोसोल डिलीव्हरीच्या माध्यमातून दिली जाते. 


लशीची चाचणी पूर्ण


मागील महिन्यात या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करण्यात आली होती. BBV-154 इंट्रानसाल लशीची पहिली आणि तिसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणी दरम्यान, ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. ही लस चाचणी पूर्ण झाल्यानंतर बुस्टर डोस म्हणूनदेखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात  आली. 


तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात आली होती. पहिल्या डोसच्या चाचणीसाठी अनेक पातळीवर चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करण्यात आली होती. याची तुलना COVAXINO सोबत करण्यात आली. भारत बायोटेकने संपूर्ण भारतात 14 ठिकाणी लस चाचणी केली होती. 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. त्यामुळे लशीचा चांगला परिणाम दिसून आला. कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरण्याचे संकेत दिसून आले.