Coronavirus Cases in India : जगभरात कोरोनाच्या  XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा (Omicron Sub-Variant) संसर्ग वाढताना दिसत आहे. यासोबतच भारतातही या व्हेरियंटच्या (Coronavirus Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. मात्र, देशातील कोरोना (India Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होणे, ही एक दिलासादायक बाब आहे. देशात आज 89 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मार्च 2020 नंतर पहिल्यांदा देशातील कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली पोहोचली आहे. कोरोना लाटेच्या काळात रुग्णांचा आकडा लाखापर्यंत पोहोचला होता. सध्या देशात 2,035 सक्रिय रुग्ण आहेत.


एकूण 4,46,81,233 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण


देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा चार कोटींच्या पार गेला आहे. देशात एकूण 4,46,81,233 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 89 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोना विषाणूने 5,30,726 रुग्णांचा बळी घेतला आहे. दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही. देशात सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. 


XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण किती?


परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर कोविड चाचणी (Covid Test) करण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचा (Covid19) कहर पाहता खबरदारी म्हणून ही पाऊले उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. जगभरात कहर माजवणाऱ्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. देशात सध्या XBB.1.5 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. याशिवाय  BF.7 व्हेरियंटचे भारतात 14 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात बंगाल येथे XBB चे रुग्ण सापडले आहेत.






'या' राज्यांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक


कर्नाटकनंतर आता केरळमध्येही मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी मास्कसक्ती लागू आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला, तरी धोका टळलेला नाही. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता केरळमध्ये नागरिकांना सार्वजनिक ठिकाण मास्क घालणे बंधनकारक असेल. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळ आणि कर्नाटकात मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


'Kraken' कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरियंट, लसीकरणानंतरही संसर्गाचा धोका