नवी दिल्ली : अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या होम क्वारन्टाईन आहेत. कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
खासदार हरसिमरत कौर बादल यांनी लिहलंय की, कोरोनाची लक्षणं दिसायला लागल्यावर टेस्ट केली, त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत: ला होम क्वॉरन्टाईन करुन घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2.17 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1185 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी, बुधवारीही दोन लाखांच्या वर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. त्यामुळे देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचं दिसून येतंय.
देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.23 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 88 टक्के इतका आहे. एकूण अॅक्टिव्ह केसच्या प्रमाणात वाढ झाली असून ती 10 टक्क्याहून जास्त झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतोय तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतील जगात दुसरा क्रमांक लागतोय.
महत्वाच्या बातम्या :