Coronavirus in India : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी देशभरात 9195 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता मागील 24 तासांमध्ये 13,154 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 268 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. देशातील 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्रात 252 आणि दिल्लीत 263 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाची स्थिती काय?
कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 48 लाख 22 हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 860 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ५८ हजार लोक बरे झाले आहेत. 5400 कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 82,402 वर पोहोचली आहे. या लोकांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात बाधितांची संख्या वाढली
राज्यात बुधवारी 3 हजार 900 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये 2510 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 251 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 8060 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Omicron Test Symptoms : ओमायक्रॉन कसा ओळखायचा?, भारतीय संशोधकांनी लढवली भन्नाट युक्ती
- WHO चा इशारा, कोरोनाच्या सुनामीत आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होणार पण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha