Coronavirus Updates : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे येणाऱ्या कोरोनाच्या सुनामीत आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होण्याचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मागील काही दिवसांमध्ये जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर, जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी पुढील वर्षात कोरोनाचा जोर ओसरणार असल्याचे म्हटले आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की,  अधिक वेगाने फैलावणारा डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट आल्याने कोरोनाची सुनामी येणार असल्याचे त्यांनी म्हटले. या सुनामीमुळे याआधीच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे थकलेले आरोग्य कर्मचारी आणि दबावात काम करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होणार आहे.  


फक्त कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे हा ताण निर्माण होणार नाही. तर, मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्याशिवाय ज्या नागरिकानी कोरोना लस घेतली नाही. त्यांचा या संसर्गामुळे मृत्यू होण्याचा मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रेयसेस यांनी म्हटले. 


दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी म्हटले की, पुढील वर्षी 2022 मध्ये कोरोना महासाथीची तीव्रता कमी होणार आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे संपुष्टात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओमायक्रॉन किती घातक  आहे, बाबत ठोस वक्तव्य इतक्या करता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. जगात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha