India Coronavirus Updates : देशात एकीकडे कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी दुसरीकडे अद्याप कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 24 हजार 354 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 234 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येत मात्र हळूहळू घट होताना दिसत असून ती आता 2 लाख 73 हजार 889 इतकी झाली आहे. त्या आधी गुरुवारी देशात कोरोनाच्या 26 हजार 727 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 277 लोकांचा मृत्यू झाला होता. 


देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून शुक्रवारी कोरोनाचे 69 लाख 33 हजार 838 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण 89 कोटी 74 लाख 81 हजार 554 इतके डोस देण्यात आले आहेत. 


केरळमध्ये शुक्रवारी 13 हजार 834 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 95 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांनंतर केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळतंय. 


 






राज्यातील स्थिती 
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी  3,105 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 3 हजार 164  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 74  हजार 892  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे. 
 
महत्वाच्या बातम्या :