मुंबई : देशात काल सलग 24 व्या दिवशी 50 हजारापेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 16 दिवसांत पाचव्यांदा 40 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आज देशात 31 हजार 118 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासंदर्भातील ही संख्या अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे तर मृत्यूच्या बाबतीत ही पाचव्या क्रमांकाची संख्या आहे.
गेल्या 24 तासांत 41 हजार 985 लोक बरे
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 94 लाख 62 हजार 810 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत एक लाख 37 हजार 621 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासात 41 हजार 985 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही चार लाख 35 हजार 603 इतकी आहे.
मृत्यू दर आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट
देशभरात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही सात टक्के आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोनाच्या अॅक्टिव्ह केस, मृत्यू दर आणि रिकव्हरी दराचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाच्या मृत्यू दरात आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे ही देशासाठी दिलासादायक बातमी आहे.
देशात अॅक्टिव केसची संख्या 5 टक्क्यापेक्षा कमी
देशातील 26 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा कमी आहे. तर इतर राज्यांत ही संख्या 20 हजारपेक्षा जास्त आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 1.46 टक्के इतकी आहे तर रिकव्हरी दर हा 93.68 इतका आहे. अॅक्टिव्ह केस सध्या 5 टक्क्यापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आढळते.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता, गर्दीशी संपर्क येणारे 150 जण कोरोना पॉझिटिव्ह
- सीरमची लस असुरक्षित असल्याचा चेन्नईच्या स्वयंसेवकाचा आरोप; सीरमने आरोप फेटाळले, 100 कोटींचा दावा
- मुंबईतील रूग्ण दुपटीच्या कालावधीत घसरण; 300 च्या घरात असलेला कालावधी आता 196 दिवसांवर