Coronavirus Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 39 हजार 796 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 723 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात सलग सातव्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येचे नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यातही घट झाली आहे. जाणून घ्या सध्या देशातील कोरोना स्थिती काय आहे


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 85 हजार 229
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 97 लाख 430
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 82 हजार 71
एकूण मृत्यू : 4 लाख 2 हजार 728
आतापर्यंत एकूण लसीकरण : 35 कोटी 28 हजार 92 हजार 46


देशात गेल्या 24 तासांत 14 लाख 81 हजार 583 कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, भारतात रविवारी 15 लाख 22 हजार 504 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 41 कोटी 97 लाख 77 हजार 457 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 


रविवारी राज्यात केवळ 3,378 रुग्णांना डिस्चार्ज तर 9,336 नवीन रुग्ण


राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात काल (रविवारी) केवळ 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस हळू हळू वाढू लागल्या आहेत. अॅक्टिव्ह केसेस आता एक लाख 23  हजारांच्या वर  गेल्या आहेत. काल मालेगाव आणि गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1461 तर कोल्हापूर शहरात 389 असे एकूण 1850 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सांगलीचा आकडाही हजारांच्या वर नोंदवला आहे. आज 38 मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 


मुंबईत गेल्या 24 तासात 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


Mumbai Pune Corona Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,98,696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 767 दिवसांवर गेला आहे. 


रविवारी धारावीत एकही रुग्ण नाही


आशिया खंडातील सर्वात मोठी दाटवस्ती असलेली झोपडपट्टी धारावीची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु झालेली पाहायला मिळत आहे. धारावीमध्ये आज एकाही नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून सध्या फक्त कोरोनाचे 22 सक्रीय रुग्ण राहिले आहेत.  याआधी 15 जून रोजी देखील धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :