Covid-19 Alert for India : भारतामध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya ) आज 23 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.
'सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून'
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, 'आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. सध्या चीन आणि भारतामध्ये थेट विमानसेवा नाही पण लोक इतर मार्गाने भारतात येत आहेत. अशा परिस्थितीत नवा विषाणू भारतात प्रवेश करू नये आणि नागरिकांना प्रवासातही कोणताही अडथळा येणार नाही यावरही आम्ही भर देत आहोत.
कर्नाटकामध्ये मास्कसक्ती, महाराष्ट्रातही होणार?
भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 सबव्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. BF.7 चे भारतात चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कर्नाटकमध्ये (Karnataka) मास्क (Mask) वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारने एसी रूममध्ये (AC Room) आणि बंद ठिकाणी (Closed Places) मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोरोना आढाव्यासंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्ती लागू केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट
नाकावाटे दिली जाणार कोरोना लस
भारतात आता नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीला (Nasal Corona Vaccine) मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस वापरण्यास परवानगी दिली आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून ओमायक्रॉन आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट याचा वेगाने संसर्ग होत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडल्याने भारत सरकार अलर्टवर आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून बैठका घेण्यात येत आहेत. गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीही महत्त्वाची कोरोना आढावा बैठक पार पडली. केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.