नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसमुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोना बाधितांची संख्या लवकरच 6 हजारांचा टप्पा ओलांडणार आहे. मागील 24 तासांत कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 591 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सध्याच्या आकडेवारीनुसार, देशात 5218 रूग्ण आहेत, तर आतापर्यंत 477 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील 24 तासांत देशांत झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात आठ, गुजरात आणि मद्यप्रदेशात प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मिरमध्ये दोन तसेच पंजब, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 9, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्ये प्रत्येकी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश, जम्मू कश्मीर आणि उत्तरप्रदेशमधून प्रत्येकी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर बिहार, हिमाचल प्रदेश आणि ओडिसामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांमध्ये 71 विदेशी नागरिक आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या 149 सांगितली होती.
पाहा व्हिडीओ : लॉकडाऊननंतर म्हणजे 14 एप्रिलनंतर रेल्वे आणि लोकल सुरू होणार का?
कोरोनाला 100 दिवस पूर्ण; जगभरात रूग्णांची संख्या 16 लाख पार
कोरोना व्हायरससारख्या घातक आजाराविरोधा लढाईचा आजचा शंभरावा दिवस आहे. मागील 100 दिवसांत भारतासह संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतासह संपूर्ण जगभरात या आजारामुळे लाखो लोक बाधित आहेत.
जगभरात 95 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोणालाच माहिती नाही की, या व्हायरसचा सामना आणखी किती दिवस करावा लागणार आहे. या महामारीमुळे गुरुवारी मृतांचा आकडा 90,000 पार पोहोचली आहे. मृतांच्या एकूण आकडेवारीपैकी 90,938 रूग्णांपैकी सर्वाधिक प्रभाव इटली, स्पेन आणि अमेरिकेवर झाला आहे. इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून आतापर्यंत 18,279 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कळव्यातील सहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा, तर मुंब्र्यात तब्बल पाच जणांना संसर्ग
देशात गेल्या 24 तासात 549 कोरोनाबाधित रुग्ण, तर 17 जणांचा मृत्यू : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
coronavirus | मांजर पाळताय, खबरदारी घ्या ! मांजरामुळे होऊ शकतो 'कोरोना'