नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार, देशातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा 12380 पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे 414 लोकांनी जीव गमावला आहे. देशात 10477 लोकांवर उपचार सुरू असून त्यातील 1488 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.


कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत 414 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकूण 392 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 187 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये 53, दिल्लीमध्ये 32 आणि गुजरातमध्ये 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यवार आकडे : 


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 2916 पार पोहोचली आहे. तर 187 लोकांचा मृत्यू झाली आहे. याव्यतिरिक्त 295 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये एकूण 1578 रूग्ण समोर आले आहेत. तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 लोक ठिक झाले आहेत.


तामिळनाडूमध्ये कोरोना व्हायरसचे 1242 रूग्ण समोर आले आहेत. तर 14 लोकांचा मृत्यू झाला असून 118 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये 1023 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 147 लोक बरे झाले आहेत. मध्यप्रदेशात 987 कोरोनाचा संसर्ग झाला असून 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 64 लोक या आजारातून बरे झाले आहेत.


गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 766 इतकी आहे. तर 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त 64 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 647 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 120 लोक बरे झाले आहेत.


आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 170 जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित केलं आहे. याव्यतिरिक्त संसर्गाचा धोका असणारे 207 जिल्हे चिन्हित केले असून हे हॉटस्पॉट नाहीत. परंतु, संसर्गाचा धोका पाहून त्याठिकाणी हॉटस्पॉट घोषित केला जाऊ शकतो. तसेच देशात कम्युनिटी ट्रान्सफरचा धोका नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


संबंधित बातम्या : 


Lockdown | रेल्वेचे बुकिंग कालपर्यंत का सुरु होतं?


Lockdown 2 | काय करता येईल, काय नाही, दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी


Monsoon | यंदा मान्सून सामान्य, जून ते सप्टेंबर महिन्यात 96 ते 100 टक्के पाऊस : हवामान विभाग