केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा. दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
20 एप्रिलनंतर या गोष्टींची अंमलबजावणी (कोरोना हॉटस्पॉट असलेली क्षेत्रं वगळता)
आयटी कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करु शकतील
शेतीशी संबंधित सर्व व्यवहारांना सूट
ग्रामीण भागातल्या काही उद्योगांनाही सूट
मनरेगाची कामं चालूच राहणार
ई-कॉमर्स कंपन्यांनाही काम करण्याची परवानगी
कुरिअर सेवांना काम करण्याची परवानगी
लॉकडाऊन अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल आणि लॉज सुरु करणार
मोटर मेकॅनिक, कार पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर लोकांना काम करण्याची परवानगी
SEZ मधील उद्योगांना काम करण्याची परवानगी.
गावांमध्ये रस्ते आणि इमारत बांधकामांना परवानगी
कामाच्या ठिकाणी शिफ्टमध्ये एक तासाचा ब्रेक असावा
ज्यांची मुलं पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशा कामगारांना शक्यतो वर्क फ्रॉम होम द्यावं
दुसऱ्या टप्प्यात आजपासून (15 एप्रिलपासून) या गोष्टींवर निर्बंध
पूर्ण देशात रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर बंदी
शाळा, महाविद्यालय, कंपन्या, रेस्टॉरंट, हॉटेल्स बंद
सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम बंद
कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणं बंधनकारक
राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन तीन मेपर्यंक बंद
देशात तीन मे पर्यंत बंद सर्व धार्मिक स्थळं बंद
रस्त्यावर थुंकल्यावर दंड, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यावर कारवाई
हॉटस्पॉट क्षेत्रात केवळ आवश्यक सामग्रीचीच उपलब्धता
दारू, गुटखा, तंबाखू विक्रीवर कडक बंदी असावी
महत्वाचं- सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही ज्या क्षेत्रांमध्ये नियम शिथिल केले आहेत त्याच क्षेत्रांमध्ये केली जाईल. 20 एप्रिलपर्यंत अशा क्षेत्रांना निवडलं जाईल. ज्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट नाही किंवा कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता नाही अशा विभागात ही सवलत दिली जाणार आहे.
20 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होणार?
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणं 3 मेपर्यंत आपल्या सर्वांना, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागेल. पुढच्या एका आठवड्यात कोरोना विरोधातील लढाईमध्ये नियम आणखी कठोर करण्यात येतील. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, ठिकाण आणि राज्यावर बारिक नजर ठेवली जाईल. तिथे लॉकडाऊनचं किती पालन होत आहे, त्या क्षेत्राने कोरोनापासून स्वतःला कितपत वाचवलं आहे, हे पाहिलं जाईल. तसेच ते म्हणाले की, जी क्षेत्र या अग्निपरीक्षेत सफल होतील, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांची हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी असेल तिथे 20 एप्रिलपासून वर दिलेल्या आवश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.