नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या तीन लाख 80 हजारांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 लाख 80 हजार 532 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 12537 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लाख 4 हजार 710 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांमध्ये कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक 13,586 नवे रुग्ण आढळून आले असून 336 लोकांचा मृत्यू झाला आहे.


जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणारा चौथा देश


देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारताना शुक्रवारी कोरोना बाधितांच्या संख्येत ब्रिटनलाही मागे टाकलं आणि जगभरातील टॉप-4 कोरोना बाधित देशांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. अमेरिका, ब्राझील, रशियानंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतापेक्षा अधिक रुग्णसंख्या अमेरिका (2,263,651), ब्राजील ( 983,359), रशिया (561,091) मध्ये आहे. अमेरिका, ब्राझीलनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो.


अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणाऱ्या टॉप-5 राज्य


ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 1 लाख 49 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 53 हजारांहून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर देशात सर्वाधिक रुग्णसंख्या दिल्लीत आहे. तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत.


अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत चौख्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, भारत असा चौथा देश आहे, जिथे सध्या सर्वाधिक कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचा सुरु आहेत.


देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात


राज्यात गुरुवारी 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


चीनसोबतच्या तणावानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाची तारीख लांबणीवर


तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर


मोरारी बापूंचं वादग्रस्त वक्तव्य, कृष्णभक्तांच्या संतापानंतर मागितली माफी