द्वारका: गुजरातच्या द्वारकामधील जगप्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू हे सध्या चर्चेत आहेत. भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम हे मद्यपी होते आणि कृष्णाचं द्वारकामधील राज्य फेल होतं, असं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर कृष्णभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मोरारी बापूंच्या वक्तव्याचा सर्वस्तरांतून विरोध झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. मोरारी बापूंनी एक व्हिडीओ शेअर करत श्रीकृष्ण भक्तांची माफी मागितली आहे.
काल मोरारी बापूंवर एका भाजपच्या माजी आमदाराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार पबुभा माणेक हे मोरारी बापू यांच्या एका वक्तव्यावर नाराज होते. त्यावरुन त्यांनी मोरारी बापूंवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मोरारी बापू आणि माणेक समोरसमोर आल्यावर हा प्रकार घडला. यावेळी खासदार पूनम माडम यांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरणं निवळलं.
माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मोरारी बापू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम हे मद्यपी होते आणि कृष्णाचं द्वारकामधील राज्य फेल होतं, असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर काल ते द्वारकामध्ये माफी मागण्यासाठी आले होते. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या विरोधी वक्तव्य कथाकार मोरारी बापू यांना चांगलंच महागात पडलं. माफी मागायला आलेल्या मोरारी बापू यांच्या समोर भाजपचे माजी आमदार पबुभा माणेक आले त्यावेळी त्यांनी मोरारी बापूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पभुवा माणेक यांनी एबीपी अस्मिताशी या मुद्द्यावर बोलताना सांगितलं की, मला जिथं कुठं मोरारी बापू भेटतील त्यावेळी मी त्यांनी नक्की विचारणार की त्यांनी बलरामला मद्यपी असं का म्हटलं? त्यांनी सांगितलं की, मी मोरारी बापूंवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला नाही. मी फक्त त्यांना कोणत्या आधारावर हे वक्तव्य त्यांनी केलं हे विचारत होतो. हिंदू धर्मावर कुणी अशी वक्तव्य करत असेल तर राग का येणार नाही? मी केवळ मोरारी बापूंना प्रश्न विचारत होतो असं, पभुवा माणेक यांनी सांगितलं.
दरम्यान, मोरारी बापूंच्या वक्तव्याचा सर्वस्तरांतून विरोध झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. मोरारी बापूंनी एक व्हिडिओ शेअर करत श्रीकृष्ण भक्तांची माफी मागितली आहे. व्हिडीओमध्ये बापूंनी म्हणतात की, माझ्यामुळे कोणी दु:खी होण्यापूर्वी मला समाधी घेणं आवडेल. सदर व्हिडीओमध्ये मोरारी बापू खूप अस्वस्थ दिसत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील वाहात होते. हे अश्रू माझ्या डोळ्यातून नव्हे तर आत्मामधून येत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morari Bapu | मोरारी बापूंचं वादग्रस्त वक्तव्य, कृष्णभक्तांच्या संतापानंतर मागितली माफी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2020 10:52 AM (IST)
कथावाचक मोरारी बापू (Morari Bapu) हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा सर्वस्तरांतून विरोध झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -