मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन वाढवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मात्र लॉकडाऊन 4 नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतीलअसंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
मार्च महिन्यापासून पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा देशातील जनतेशी संवाद साधला होता. पहिला संवाद हा जनता कर्फ्यूची घोषणा करताना साधला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करताना, मग 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना मोदींनी तिसऱ्यांदा देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर आज (12 मे) रात्री आठ वाजता पंतप्रधान पुन्हा एकदा देशाला उद्देशून भाषण केलं.
लॉकडाऊनचे तीन टप्पे
पहिला लॉकडाऊन : 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन : 4 मे ते 17 मे
4 मे पासून तात्काळ स्वरुपात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन सुरु राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटलं होतं. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये सरसकटपणे काही सेवा बंदच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही गोष्टींना सुट देण्यात आली होती.
आत्मनिर्भर भारत अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत अभियान' या 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पनाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. या पॅकेजद्वारे देशातील जनतेला फायदा होणार आहे. या आत्मनिर्भर पॅकेजमुळे भारताला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. जगातलं सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Lockdown 4 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा,कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज
संबंधित बातम्या :