नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी देशात लॉकडाऊन लागू केलाय ज्याचा आज अठरावा दिवस आहे, मात्र जसे दिवस वाढतायत तशीच कोरोनाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात आतापर्यंत 7447 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 643 रुग्ण बरेदेखील झालेत, 239 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1800पर्यंत गेली आहे, राज्यात आतापर्यंत 110 रुग्णांचे कोरोनामुळे जीव गेले आहेत.


India Lockdown | WHO | घाईत लॉकडाऊन हटवल्यास घातक परिणाम : डब्लूएचओ



कोरोनामुळे कोणत्या राज्यात किती रुग्णांचा मृत्यू?


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अहवाल


महाराष्ट्र - 110
गुजरात - 19
मध्य प्रदेश - 33
पंजाब - 11
दिल्ली - 13
तामिळनाडू - 8
तेलंगणा - 7
आंध्र प्रदेश - 6
कर्नाटक - 6
पश्चिम बंगाल - 5
जम्मू-काश्मिर - 4
उत्तर प्रदेश - 4
हरियाणा - 3
राजस्थान - 3
केरळ - 2
बिहार - 1
झारखंड - 1
हिमाचल प्रदेश - 1
ओडिसा - 1




देशात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालय


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कम्युनिटी ट्रान्समिशनबद्दल म्हटलंय की आतापर्यंत देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही, मात्र आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी भारताला 1 करोड हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांची आवश्यकता आहे, भारताकडे तब्बल 3.28 करोड हायड्रॉक्सीक्लोरोक्विन टॅबलेट्स उपलब्ध आहेत. भारताला अनेक देशांकडून यासाठी मागणीदेखील आली आहे. आवश्यकतेव्यतिरिक्त काही औषधांची निर्यात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.


Indian Lockdown | देशातील लॉकडाऊनचा आज फैसला, पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक



कोरोना व्हायरस काय आहे?


नोव्हेल कोरोना हा एक विषाणू (व्हायरस) आहे, जो सर्वात पहिल्यांदा चीन देशाच्या वुहान येथे आढळला. याला नोव्हेल म्हणण्यात येते कारण हा विषाणू पहिल्यांदाच आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराला 'कोविड 19' हे नाव दिले आहे.


कोरोना व्हायरसचा स्रोत (मूळ) काय?


सध्यातरी या विषाणूच्या संसगार्चा खात्रीशीर स्रोत कळलेला नाही. कोरोना विषाणू हे विषाणूंचे एक मोठं कुटुंब आहे, या विषाणूंमुळे लोकही आजारी पडतात आणि काही विषाणू प्राण्यांमध्ये पसरतात. सुरुवातीला चीनच्या वुहान येथे पसरलेल्या या साथीमधील लोकांचा सागरी अन्न आणि प्राणी बाजाराशी संबंध आला होता, अशी नोंद आहे.


कोरोनाची लक्षणं काय?


आतापर्यंत या आजाराच्या रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि श्वासोछ्वास करण्यास होणारा त्रास, अशी आहेत.