नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 42 हजारावर गेली आहे. देशातील रुग्णांचा आकडा आता 42 हजार 553 वर गेला आहे. आत्तापर्यंत 11 हजार 707 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत देशात 1373 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 548, गुजरातमध्ये 290, मध्य प्रदेशात 156, राजस्थानात 71, दिल्लीत 64, उत्तर प्रदेशात 43, आंध्र प्रदेशात, 33, पश्चिम बंगालमध्ये 33 तमिळनाडूमध्ये 30, तेलंगाणा 29, कर्नाटकात 25, पंजाबमध्ये 21, जम्मू-काश्मिर 8, हरियाणा 5, केरळ 4, झारखंड 3, बिहार 4, आसाम 4 जणांचा तर हिमाचल, प्रदेश, मेघालय आणि ओडिसामध्ये प्रत्येकी एक जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 48 हजार 565वर पोहोचली आहे. तसेच या व्हायरसपासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील 130 जिल्हे रेड, 284 जिल्हे ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहे. देशातील सर्व मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत.
#Lockdown | रेड झोनमध्ये कंटेन्मेंट भाग वगळता सर्व दुकानं सुरू होणार! दारुची दुकानंही सुरू होणार, राज्य सरकारचा निर्णय
संबंधित बातम्या :