नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या 2566 वर पोहोचली आहे. त्यापैकी 191 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात 339, केरळमध्ये 286, तामिळनाडूमध्ये 309, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 135, राजस्थानमध्ये 133, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 121, मध्यप्रदेशात 98 रूग्ण आढळून आले आहेत.


आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली, दिल्लीत झालेल्या धार्मिक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, 9000 लोकांना ट्रॅक करण्यात आलं आहे. या लोकांचा संबंध तब्लिकींशी होता. यामध्ये 1306 विदेशी नागरिक आहेत. तर दिल्लीत शोधण्यात आलेल्या 2500 लोकांपैकी 250 विदेशी नागरिकांचा समावेश होता. यापैकी 1804 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कोरोनाटी लक्षणं असलेल्या 334 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील 24 तासांमध्ये 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : कोरोनामुळे कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ, सिंधुदुर्गातील मासेमारी 100% बंद | स्पेशल रिपोर्ट



आज सकाळी 9 वाजता व्हिडीओमार्फत संदेश जारी करणार मोदी


देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी वेळोवेळी देशवासियांचा संबोधित करत असतात. आज देखील ते या विषयासंदर्भात एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशवासियांसाठी एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहे, असं यात त्यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आता नेमकी काय भूमिका घेणार? याकडे देशाचं लक्ष लागले आहे.


झारखंडमध्ये आतापर्यंत दोन लोकांना कोरोनाची लागण


झारखंडमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा दुसरा रूग्ण हजारीबाग येथे आढळून आला आहे. हजारीबागचे उपायुक्त भुवनेश प्रताप सिंह यांनी बुधवारी सांगितलं की, 29 मार्च रोजी कोलकत्यामध्ये एका विवाहसोहळ्यात सहभागी झाल्यानंतर हजारीबाग येथील विष्णुगढ येथे हा रूग्ण पायी परतला होता. त्यांनी सांगितलं की, 'या कोरोनाबाधिताचं वय 30 वर्ष असून त्याच्यातील कोरोनाची लक्षणं ओळखून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातून त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं.'


बिहारमध्ये कोविड-19 रूग्णांची संख्या 28 वर


पाटना 2 एप्रिलला बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले 4 नवे रूग्ण आढळून आले असून त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून संख्या 28 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.


coronavirus | वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा बळी, कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा मृत्यू


महाराष्ट्रात 423 लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा 21वर


देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी 88 नवे रूग्ण समोर आल्यानंतर राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 423वर पोहोचला आहे. तर 21 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मुंबईमध्ये 4 आणि पुण्यात 1 मृत्यू झाला आहे. तर 42 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.


जगभरात कोरोना बाधितांची संख्या 10 लाख पार, 51000 पेक्षा अधिक मृत्यू


जगभरात कोरोनामुळे दहा लाखांहून अधिक जण कोरोनाग्रस्त आहेत. तर 51 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी द्वारे गुरुवारी रात्री जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर एएफपी द्वारे काढण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात 188 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग कमीत कमी 10,00,036 रूग्ण समोर आले आहेत. तर आतापर्यंत 51,718 लोकांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या : 


PM Modi | पंतप्रधान काय सांगणार? कोरोनासंदर्भात मोदींच्या व्हिडीओ संदेशाकडे देशाचे लक्ष

Corona Lockdown | 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना