नवी दिल्ली : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं असून या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांतून कोरोना व्हायरसचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 137 कोरोनाबाधित असून त्यापैकी 24 एनआरआय आहेत.


कोणत्या राज्यात किती रूग्ण?


कोरोमा व्हायरसमुळे संसर्ग झालेल्यांमध्ये 113 भारतीय नागरिक आहेत. त्यातील 14 रूग्ण बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये आठ रूग्ण असून त्यापैकी दोनजण ठिक झाले आहेत. कर्नाटकमध्ये एकूण 8 रूग्ण असून त्यापैकी एक रूग्ण ठिक झाला आहे, केरळमध्ये 26 रूग्ण असून त्यापैकी तीन जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. उत्तरप्रेदशमध्ये एकूण 15 रूग्ण आढळले असून त्यापैकी 5 जण ठिक झाले आहेत. तर महाराष्ट्रात तीन विदेशी नागरिकांसह 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लढाखमध्ये 6, जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 आणि तेलंगणामध्ये 5 रूग्ण आहेत. राजस्थानमध्ये दोन विदेशी नागरिकांसह एकूण 4 लोकांना संसर्ग झाला आहे. तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. ओडिशामध्ये सोमवारी कोविड-19 ची लागण झालेला एक रूग्ण आढळून आला होता.


पाहा व्हिडीओ : CM on Mumbai Local | मुंबई लोकलची गर्दी कमी झाली नाही तर लोकल बंद करावी लागेल - मुख्यमंत्री



याव्यतिरिक्त हरियाणामधील एकूण 15 कोरोनाग्रस्त आहेत, त्यातील 14 लोक विदेशी आहेत. उत्तराखंडमध्येही एक रूग्ण आढळून आला आहे. केरळमध्ये दोन विदेशी नागरिकांसहित 26 लोक या व्हायरसमुळे बाधित झालेले आहेत. यांमध्ये मागील महिन्यात यामुळे ठिक झालेल्या लोकांचाही समावेश होतो. तर भारतात ती कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.


भारतात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू


मुंबईमध्ये दुबईमधून परतलेल्या एका 64 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा काल मृत्यू झाला आहे. याआधी मागील मंगळवारी कुलबर्गी येथील 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून हा रूग्ण सौदी अरबमधून परतला होता. तसेच दिल्लीतील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 68 वर्षीय महिलेलाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. याव्यतिरिक्त कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या 57 हजार लोकांवर लक्ष ठेवलं जात आहे.


पाहा व्हिडीओ : Exclusive Aaditi Tatkare | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी का उपाययोजना? पर्यटन मंत्री आदिती तटकरे



युरोपीय देश, तुर्की, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन ट्रॅव्हल अॅडव्हायझरी लागू करण्यात आली आहे. युएई, कतार, ओमान आणि कुवेत येथून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन म्हणून रहावं लागणार आहे. हा निर्णय आजपासून लागू करण्यात येणार आहे. युरोपीय देश, टर्की येथून येणाऱ्या कोणत्याच प्रवाशाला भारतीय एअरलाइन भारतात आणणार नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग अनेक देशांमध्ये वेगाने होत आहे. हे लक्षात घेता सोमवारी सरकारने युरोप, टर्की आणि ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे.


शाहिन बाग : प्रयागराजमध्ये सीएएच्या विरोधात महिलांचं आंदोलन सुरूच


देशात एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना गर्दी न करण्याचं तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मिस्लिम महिला कशाचीही पर्वा न करता आंदोलन करत आहेत. या महिलांनी प्रशासनाने केलेलं अपीलही फेटाळून लावलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेलं आंदोलन 94 तर प्रयागराजमध्ये सुरू असलेलं आंदोलन 65 दिवसांपासून सुरू आहे.


संबंधित बातम्या :


Coronavirus | तुमच्या घरी येणाऱ्या न्युजपेपरवर कोरोना व्हायरस तर नाही?


सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


oronavirus : कोरोनामुळे डाळ उद्योगाला भरभराटीचे दिवस

Coronavirus राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली; विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेणार एमपीएससी