Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशाची चिंता आणखी वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थितीबाबत.. 


आतापर्यंत देशात 4 लाख 82 हजार 876 रुग्णांचा मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 85 हजार 401 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 876 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (बुधवारी) 19 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 4 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 





देशातील कोरोनाची सद्यस्थिती : 



  • गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांची संख्या : गेल्या 24 तासांत 19 हजार 206 रुग्ण

  • गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांचा मृत्यू : 325 रुग्ण

  • देशाचा रिकव्हरी रेट : 98.01 टक्के 

  • सध्या देशातील सक्रिय रुग्ण : 2 लाख 85 हजार 401 

  • आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या : 4 लाख 82 हजार 876 

  • एकूण लसीकरण : 148 कोटी 67 लाख 80 हजार 227 


आतापर्यंत 148 कोटींहून अधिक लसीचे डोस 


देशव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसींचे 148 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (बुधवारी) 91 लाख 25 हजार 99 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण लसीकरणाचा आकडा 148 कोटी 67 लाख 80 हजार 227 डोस देण्यात आले आहेत. 


बुस्टरसाठी आधी घेतलेल्या लसीचेच डोस


10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस ( Booster shot ) देण्यात येणार आहे. बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोरोना टास्क फोरचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, तीच लस बुस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह