Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही सुरुच आहे. देशात अजूनही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 12 हजार 830 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 446  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 58 हजार 186  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4 हजार 667 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या  59 हजार 272 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 73 हजार 300  जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी  3  कोटी 36 लाख 55 हजार 842 लोक कोरोनामुक्त झाली आहे. 
 
केंद्रीय आरोग्य  मंत्रालयानं जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार, देशात काल  68 लाख 4 हजार 806 लसी देण्यात आल्या. देशात आतापर्यंत  106  कोटी 14 लाख 40 हजार 335 लोकांना लस देण्यात आली आहे. भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR)ने सांगितले की, देशात काल कोरोनाच्या 11 लाख 35 हजार 142 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. 



मुंबईकरांना दिलासा! कोरोनाचा ग्रोथ रेट 0.04 टक्क्यांवर तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1555 दिवसांवर 
मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोनाचा साप्ताहिक ग्रोथ रेट कमी होऊन ०.०4 टक्केंवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईचा ग्रोथ रेट 0.06 टक्केंवर पोहचला होता. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही 1556 दिवसांवर पोहचला आहे. शहरात झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. मुंबईतील ॲक्टिव्ह कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्याही चार हजारांपेक्षा कमी झाली आहे.  


India on Cryptocurrency: पुढील अर्थसंकल्पात क्रिप्टोचे नियमन करणार भारत सरकार, बंदीचा विचार नाही : रिपोर्ट


 मुंबईकरांना दिलासा! कोरोनाचा ग्रोथ रेट 0.04 टक्क्यांवर तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1555 दिवसांवर