Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 10 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याच वेळी, काल 392 जणांचा मृत्यू झालय. अशातच कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 60 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या, देशातील कोरोना व्हायरसची नवीनतम स्थिती काय आहे.    


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 509 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत घट होत 1 लाख 46 हजार 950 वर आली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 37 लाख 37 हजार 468 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


लसीकरणाचा आकडा 107 कोटींच्या पार   


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनाच्या 20 लाख 15 हजार 942 लसीचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर देशात आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे.


राज्यात मंगळवारी 802 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 17 जणांचा मृत्यू


कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 802 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 886  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 57  हजार 149 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.6 टक्के आहे. 

राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 14 हजार 959  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,49,126 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 994  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 31 , 04, 874 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत आज 238 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू


गेल्या 24 तासात मुंबईत 238 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 276 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 3326 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,35,135 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1832 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.04 टक्के इतका झाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :