Coronavirus Cases Today in India : कोरोनाच्या संसर्गात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 3962 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली, तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या दिवशी 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनानं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
देशातील कोरोना रुग्णांमध्ये गुरुवारी मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. मार्चनंतर सर्वाधित 4041 रुग्णांची नोंद गुरुवारी झाली. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजारांवर पोहोचली आहेत. भारतात सध्या 22 हजार 416 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.05 टक्के आहे. तर देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.73 टक्क्यांवर पोहोचला आहे.
भारतात गेल्या 24 तासांत दोन हजार 697 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात चार कोटी 26 लाख 25 हजार 454 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 0.89 टक्के आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात पाच लाखहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकुण 5 लाख 24 हजार 677 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Covid-19 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; 'या' पाच राज्यांना लिहिलं पत्र
- Hyderabad Rape Case : हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर मर्सिडिजमध्ये सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश
- Kanpur Violence : कानपूर हिंसाचार प्रकरण, 18 जण अटकेत, योगींच्या कार्यकाळात आतापर्यंत किती हिंसाचाराच्या घटना घडल्या?