Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांमधील वाढ कायम आहेत. एका दिवसात 3500 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3805 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 303 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात 3545 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 303 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 303 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 3168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 54 हजार 416 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 22 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 24 रुग्णांनी प्राण गमावला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 87 हजार 544 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. 


आतापर्यंत 190 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 190 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात 17 लाख 49 हजार 63 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 190 कोटी 94 हजार 982 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.