CBSE Board Exams 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बोर्डाच्या परीक्षा आजपासून म्हणजेच, 26 एप्रिलपासून सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी 10वी आणि 12वीची परीक्षा फक्त Vocational Subject घेऊन सुरू होईल. या परीक्षांसाठी देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रं असतील, तर परदेशात 133 केंद्रं असतील. 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसह सुमारे 34 लाख मुलं परीक्षेला बसतील. CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत तर 12वीची परीक्षा 15 जूनपर्यंत पर्यंत असणार आहे.  दरम्यान, सीबीएसई बोर्डानं या परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. 


दहावीचे विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्या दिवशी चित्रकला आणि काही भाषेच्या पेपरसाठी उपस्थित राहतील. पहिला मुख्य पेपर 27 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा आणि साहित्य आहे. तर इयत्ता 12वीचे विद्यार्थी पहिल्या दिवशी Entrepreneurship & Beauty & Wellness पेपर देतील. 12वीच्या विद्यार्थ्यांचा पहिला मुख्य पेपर 2 मे रोजी हिंदीचा असेल.


CBSE बोर्डाच्या परीक्षा 2022 पूर्वी वर्षातून एकदाच होत होत्या. परंतु, यावेळी देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएसई बोर्डाकडून ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. 


CBSE Term 2 परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना 


हॉल तिकिट : परीक्षेसाठी हॉल तिकिट अनिवार्य करण्यात आले आहे.  हॉल तिकिटसह शाळेचे ओळखपत्र देखील सोबत ठेवावे. विद्यार्थ्यांनी हॉल तिकिटवर नमूद केलेल्या सर्व सूचना अगोदर वाचून त्याचे पालन करावे.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे: अनेक राज्यांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, परीक्षा देताना प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना मास्कचा वापर करावा लागणार. त्याशिवाय सोशल डिस्टेंसिंगचे वापर करावा लागणार आहे. 
परीक्षा केंद्रावर वेळेआधीच पोहचा: परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी परिक्षेच्या वेळेच्या किमान एक तास आधी पोहचा. 
CBSE ची ही परीक्षा दोन तासांची परीक्षा असणार आहे. परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 दरम्यान घेतली जाणार आहे. 
प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त वेळ: विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि वाचण्यासाठी 20 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे. 
मोबाईल, ब्लुटुथ दूर ठेवा: परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, ब्लूटूथ किंवा इअरफोन सोबत नेऊ नये. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 


CBSE टर्म 2 हॉल तिकिट कसे डाउनलोड कराल?
अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.
होमपेजवर दिसणार्‍या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.
प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
डाउनलोड करा आणि CBSE टर्म 2 परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत नेहमीच तुमच्याकडे ठेवा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI