Child Vaccination : 5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं 5-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स (Corbevax) आणि कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार सल्लागार गटाच्या (NTAGI) स्थायी तांत्रिक उपसमितीनं (STSC) 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स (Corbevax) आणि कोवॅक्सिन (Covaxin) लस वापरण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. मात्र, या लसींचा लहान मुलांच्या लसीकरणात कधीपासून आणि कशाप्रकारे समावेश करण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार सल्लागार गटाच्या (NTAGI) स्थायी तांत्रिक उपसमितीची (STSC) 16 जून रोजी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान पुढील बैठकीत 5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये 5-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसीच्या वापरासाठी पारवागनी दिली होती. तर 6 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या वापरालाही मंजुरी देण्यात आली होती.


दरम्यान, 5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तांत्रिक सल्लागार समितीच्या मते कोरोनामुळे 12 वर्षांपेक्षा कमी मुलांना कोरोनाचा संसर्ग आणि त्याच्या तुलनेनं मृत्यू याचं प्रमाण सध्या कमी आहे. त्या अद्याप 12 वर्षाखालील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या