Coronavirus Case Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग कायम आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. देशात मागील 24 तासांत 18 हजार 257 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जाहिर करत ही माहिती दिली आहे.

गेल्या 24 तासांत 14 हजार 553 रुग्ण कोरोनामुक्त

शनिवारी दिवसभरात 14 हजार 553 कोरोना रुग्णांनी विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 68 हजार 533 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 198 हून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांत 42 रुग्णांचा मृत्यू आहे. भारतात एकूण 5 लाख 25 हजार 428 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या किंचिंत घसरलीशुक्रवारच्या तुलनेत शनिवारी महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात महाराष्ट्रातील 2760 नव्या रुग्णांची भर पडली असून 2934 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर, पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 

 

मुंबईत शनिवारी 499 रुग्णांची नोंदमुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. मुंबईत शनिवारी 499 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 811 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या