Coronavirus News Cases Today : देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली असली तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 11 हजार 739 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात सध्या 92 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 917 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 92 हजार 576 इतकी झाली आहे.
मुंबईत शनिवारी 840 रुग्णांची नोंद
मुंबईत शनिवारी 840 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 2051 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 72 हजार 963 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात बी ए. 4 बी ए. 5 व्हेरीयंटचे 23 रुग्ण
शनिवारी महाराष्ट्रात 1728 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात एकूण 2708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. राज्यात पहिल्यांदाच बीए 5 व्हेरीयंट 17 आणि बीए 4 व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 11 पुरूष आणि 12 स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 49 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 28, नागपूरमधील चार आणि ठाण्यातील दोन रुग्ण आहेत.
आतापर्यंत 197 कोटी लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात 197 कोटी लसींचा टप्पा पार पडला आहे. शनिवारी दिवसभरात 11 लाख कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले. यासह देशात आतापर्यंत 197 कोटी 8 लाख 51 हजार 580 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या