Uttarakhand : उत्तराखंडमध्या सध्या शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ पिंडारी ग्लेशियर येथे प्रस्तावित नदी-जोड प्रकल्पासाठी भू-सर्वेक्षणाचे काम करत आहेत, अशातच त्यांना एक गोष्ट आढळली आहे. 2013 आणि 2019 मध्ये परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे बागेश्वरच्या कुवारी गावाजवळ (सुमारे 1,700 मीटर उंचीवर वसलेले) एक किमी-लांब आणि 50-मीटर रुंद असलेला v-आकाराचा तलाव आढळला आहे. 


उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीनंतर चमोली जिल्ह्यातील ऋषीगंगेच्या मुखावर तयार झालेल्या तलावाचे गूढ सरकारने उलगडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत म्हणतात की हा तलावाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तलावाचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या टीममध्ये 12 सदस्य आहेत. तलावाबाबत घाबरून जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


बागेश्वर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने TOI ला सांगितले, "सध्या तलावातील पाणी नैसर्गिकरित्या वाहून जात असले तरी, यामुळे नंतर मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो, ज्यामुळे पिंडर आणि अलकनंदा नदीकाठी असलेल्या वस्त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच या तलावामुळे तात्काळ धोका नाही" असेही सांगितले.


ते म्हणाले की, तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. त्याच्या अहवालानंतर तलावाची माहिती मिळेल. तसेच या तलावात किती पाणीसाठा आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यासाठी शास्त्रज्ञांचे पथक त्या भागात पाठवले जात आहे. याशिवाय अन्य काही तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाठवले जात असून, ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने तेथे सोडले जातील. तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे पुढील कृती आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली आहे. भूस्खलन आणि सरोवराच्या प्रभावामुळे, गाव ज्या डोंगरावर वसले आहे ते डोंगर उतार हळू हळू खाली सरकत आहे आणि चमोलीच्या कर्णप्रयाग येथील अलकनंदामध्ये विलीन होणाऱ्या पिंडार नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


 उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातील चमोली जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. तिद्री हे गढवाल-डेहराडून सीमेवरील संततधार पाऊस, भूस्खलन आणि येथे पाणी साचल्यामुळे एक कृत्रिम तलाव बनले आहे. स्थानिक लोकांसाठी हा तलाव एखाद्या आपत्तीपेक्षा कमी नाही. या तलावातून सतत पाणी वाहत असते, यामुळे मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले असून त्यांनी शासनाकडे पुनर्वसनाचे आवाहन केले आहे. भविष्यात या तलावातून पाणी सोडल्यास आपले सर्वस्व गमवावे लागेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तलावाची लांबी 100 मीटर आणि खोली सुमारे 50 मीटर असल्याचे सांगितले जाते.


येथे राहणाऱ्या लोकांना तलावाजवळ न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे लोक शासनाकडे पुनर्वसनाची मागणी करत आहेत. येथे ढगफुटीनंतर दरड कोसळल्याने एक घर कोसळले. या अपघातात दोन भावांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील आणखी एक सदस्य जखमी झाला. यापूर्वी टिहरी गढवाल जिल्ह्यात भूस्खलनामुळे 8 लोक गाडले गेले होते.