नवी दिल्ली : देशात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून गुरुवारी एकाच दिवशी 23 हजार 285 नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशात सलग नवव्या दिवशी 15 हजारांपेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात 117 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15,157 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलं आहे.
देशातील आतापर्यंत कोरोनाचे एकूण एक कोटी 13 लाख आठ हजार 846 रुग्ण झाले असून आतापर्यंत एकूण एक लाख 58 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या एक लाख 97 हजार 237 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या असून ती 22,52,057 इतकी झाली आहे.
देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.40 इतका आहे तर रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर हा 1.68 आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगात 11 वा क्रमांक आहे.
MPSC Exam Date 2021 | एमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर
गुरुवारपर्यंत देशात दोन कोटी 61 लाख 64 हजार 920 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. गुरुवारी एकाच दिवसात चार लाख 80 हजार 740 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रिपोर्टनुसार 2,40,37,644 जणांना वॅक्सीन देण्यात आले आहे.
लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली. 2 लाख 30 हजार 557 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतलेल्यांपैकी 5 लाख 51 हजार 398 नागरिक हे 60 वर्षापेक्षा जास्त असून 98 हजार 478 हे वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.
पाकिस्तानातून परतलेली मुकबधीर गीता गिरवतेय मराठी, गणिताचे धडे; परभणीच्या पहल फाऊंडेशनकडून सांभाळ