नवी दिल्ली: भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. रोजच्या रोज मोठ्या संख्येने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाच्या 3.92 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर मृतांचा आकडा 3689 इतका झाला आहे. शुक्रवारी देशात चार लाख रुग्ण संख्या वाढली होती. देशातील कोरोनाची रोजची ही वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. 


देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे 3500 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या जगाच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 95 लाख 57 हजार 457

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 59 लाख 92 हजार 271

  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 33 लाख 49 हजार 644

  • एकूण मृत्यू : 2 लाख 15 हजार 542

  • देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 68 लाख 16 हजार 031 डोस 


महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शनिवारी राज्यात तब्बल 63 हजार 282 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे शनिवारी 61 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 39,30,302 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  आता 84.24 % एवढा झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 802 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,73,95,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,65,754 (17.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 40,43,899 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर 26,420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महत्वाच्या बातम्या :