Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोनाचा संसर्गात किंचिंत घट झाल्याचं आढळून आलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 487 नवे कोरोनाबाधित आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी दिवसभरात 2 हजार 878 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 17 हजार 692 वर पोहोचला आहे. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.74 टक्के झाले आहेत. त्या आधीच्या दिवशी 2 हजार 858 नवीन रुग्णांची नोंद आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.


महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या 248 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने केली आहे. मुंबईत कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आणि एक रुग्णाचा बळी गेला आहे. देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी 673 नवीन कोविड प्रकरणे आणि आणखी चार मृत्यूंची नोंद झाली आहे कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 2.77 टक्के आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 18 लाख 99 हजार 745 एवढी झाली आहे. दिल्लीतील कोरोना मृतांची संख्या 26 हजार 192 वर पोहोचली आहे.  






देशात गेल्या 24 तासांत 4 लाख 5 हजार 156 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 214 इतकी झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या