मुंबई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 8 हजार 909 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाढ कोरोनाबाधितांची आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 217 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 7  हजार 615 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 303 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 4 हजार 776 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 48.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 1 लाख 1 हजार 497 आहेत.


देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत.राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 72300 झाला आहे. त्यातील 31333 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2465 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

महाराष्ट्रात काल 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, काल कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 

तामिळनाडू 24586 रुग्ण, 13706 बरे झाले, मृतांचा आकडा 197


दिल्ली  22132 रुग्ण, 9243 बरे झाले, मृतांचा आकडा 556


गुजरात  17617 रुग्ण, 11894 बरे झाले,  मृतांचा आकडा 1092


राजस्थान  9373  रुग्ण, 6435 बरे झाले, मृतांचा आकडा 203


मध्यप्रदेश 8420 रुग्ण, 5221 बरे झाले, मृतांचा आकडा 364


उत्तरप्रदेश 8361 रुग्ण, 5030 बरे झाले, मृतांचा आकडा 222


पश्चिम बंगाल 6168 रुग्ण, 2410 बरे झाले , मृतांचा आकडा 335


जगभरात कोरोनाचे जवळपास 65 लाख रुग्ण 

कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 10 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा 4528ने वाढला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 65 लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 लाख 81 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली आहे.

जगभरात कुठे किती रुग्ण, किती मृत्यू?

कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये 19 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतातील कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

अमेरिका : एकूण रुग्ण 1,881,205, एकूण मृत्यू 108,059
ब्राझील : एकूण रुग्ण 556,668, एकूण मृत्यू 31,278
रूस : एकूण रुग्ण 423,741, एकूण मृत्यू 5,037
स्पेन : एकूण रुग्ण 287,012, एकूण मृत्यू 27,127
यूके : एकूण रुग्ण 277,985, एकूण मृत्यू 39,369
इटली : एकूण रुग्ण 233,515, एकूण मृत्यू 33,530
भारत : एकूण रुग्ण 207,191, एकूण मृत्यू 5,829
फ्रान्स : एकूण रुग्ण 189,220, एकूण मृत्यू 28,940
जर्मनी : एकूण रुग्ण 184,091, एकूण मृत्यू 8,674
पेरू : एकूण रुग्ण 170,039, एकूण मृत्यू 4,634