मुंबई :   देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 9304 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाढ कोरोनाबाधितांची आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधिक वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 260 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16  हजार 919 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 4 हजार 107 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 804 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.99 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 1 लाख 6 हजार 737 आहेत.

देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 74860 झाला आहे. त्यातील 32329 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत  2587 जण मृत्यूमुखी पडले आहेत.


राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74,860 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 39,935 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 916 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 43.18 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.45 टक्के आहे.

महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 

तामिळनाडू 25872रुग्ण, 14316 बरे झाले, मृतांचा आकडा 208


दिल्ली  23645 रुग्ण, 9542 बरे झाले, मृतांचा आकडा 606


गुजरात  18100 रुग्ण, 12212 बरे झाले,  मृतांचा आकडा 1122


राजस्थान  9652 रुग्ण, 6744 बरे झाले, मृतांचा आकडा 209


मध्यप्रदेश 8588 रुग्ण, 5445 बरे झाले, मृतांचा आकडा 371


उत्तरप्रदेश 8729 रुग्ण, 5176 बरे झाले, मृतांचा आकडा 229


पश्चिम बंगाल 6508 रुग्ण, 2580 बरे झाले , मृतांचा आकडा 345


जगभरात कोरोनाचे जवळपास 65.62 लाख रुग्ण 

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 65.62 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास एक लाख 21 हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4927 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 65 लाख 62 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 86 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 31 लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 13 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 49 लाखांच्या घरात आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

  • अमेरिका:         कोरोनाबाधित- 1,901,783,        मृत्यू - 109,142

  • ब्राझील:            कोरोनाबाधित- 583,980,          मृत्यू - 32,547

  • रशिया:                कोरोनाबाधित- 432,277,        मृत्यू - 5,215

  • स्पेन:                कोरोनाबाधित- 287,406,          मृत्यू - 27,128

  • यूके:                कोरोनाबाधित- 279,856,          मृत्यू - 39,728

  • इटली:            कोरोनाबाधित- 233,836,          मृत्यू - 33,601

  • भारत:            कोरोनाबाधित- 216,824,            मृत्यू - 6,088

  • जर्मनी:            कोरोनाबाधित- 184,425,            मृत्यू - 8,699

  • पेरू:                कोरोनाबाधित- 178,914,            मृत्यू - 4,894

  • टर्की:              कोरोनाबाधित- 166,422,            मृत्यू - 4,609