नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा आलेख उतरताना दिसत आहे. शनिवारी गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे, गेल्या 24 तासात देशात एक लाख 14 हजार 460 कोरोना रुग्णांची भर पडली असून 2677 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशातील 1.89 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 77,449 रुग्णांची कमी आली आहे. 


देशात सलग 24 व्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येपेक्षा जास्त रुग्णसंख्या कोरोनामुक्त झाली आहे. शनिवारपर्यंत देशात 23 कोटी 13 लाख 22 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी एकाच दिवसात 33.53 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.  


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 88 लाख 9 हजार 339

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 69 लाख 84 हजार 781

  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 14 लाख 77 हजार 779

  • मृतांचा एकूण आकडा : 3 लाख 46 हजार 759


देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यू दर हा 1.20 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 93 टक्के आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. 


महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात शनिवारी 13 हजार 659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 21 हजार 776 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी  300 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,88,027 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,28,834 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  95.01 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारच्या खाली खाली आहे. यामध्ये नंदुरबार, बुलडाणा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. 


महत्वाच्या बातम्या :