नवी दिल्ली : जगातील प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी कोविड-19शी लढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात बिल गेट्स म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच केलेल्या उपाययोजना आणि कठोर निर्णयांमुळेच भारतातील कोरोनाचं संक्रमणातील दरात घट दिसत आहे, जे संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. बिल गेट्स यांनी नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. याच पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


बिल गेट्स यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 'आम्ही तुमचं नेतृत्व आणि तुमच्या व सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचं कौतुक करतो. ज्यांमुळे भारतावरील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी आहे.'



बिल गेट्स यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिलं आहे की, 'तुमच्या शासनाच्या वतीने लॉकडाऊनचा निर्णय घेणं, क्वॉरन्टाईन करणं, आयसोलेशनसाठी हॉटस्पॉटची ओळख करण्यासाठी चाचण्या वाढवणं, आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी प्रयत्न करणं खरचं कौतुकास्पद आहे. याव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेणं आणि डिजिटलायजेशनला प्रोत्साहन देणं देखील कौतुकास्पद आहे.


बिल गेट्स म्हणाले की, 'मला खरचं आनंद आहे की, तुमचं शासन कोविड-19शी लढण्यासाठी आपल्या असाधारण डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करत आहे. त्यांनी पुढे लिहिलं आहे की, आपल्या शासनाने कोरोना व्हायरस ट्रॅकिंग, संपर्क ट्रेसिंग आणि लोकांना आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल अॅप लॉन्च करणं एक उत्तम निर्णय घेतला आहे.'



दरम्यान, बिल गेट्स यांची मोदींचं कौतुक करण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा बिल गेट्स यांनी नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे. बिल गेट्स यांनी भरातातील स्वच्छता अभियानाचं जाहीरपणे कौतुक केलं होतं. काही दिवसांपूर्वी न्यू-यॉर्कमध्ये एका कार्यक्रमात आपल्या भाषणामध्ये बिल गेट्स यांनी स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख केला आणि स्वच्छतेकडे लक्ष वेधल्याबाबत भारत सरकारचं अभिनंदन करायला हवं असंही त्यावेळी ते म्हणाले होते. यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये एका ब्लॉगमधूनही गेट्स यांनी मोदींच्या अभियानाचे भरभरुन कौतुक केले होते. गेल्या तीन वर्षात सरकारने स्वच्छता आणि उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रमाण करण्यासाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत असे गेट्स म्हणाले होते.


संबंधित बातम्या : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 27 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार


वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश


Attack on Doctors | अमित शाहांच्या आश्वासनानंतर आयएमएच्या डॉक्टरांचं आंदोलन मागे